#समर शहा
Explore tagged Tumblr posts
Text
'कहानी घर घर की'मध्ये रुपाली गांगुलीने साकारली साक्षी तन्वरच्या मुलीची भूमिका, वर्षांनंतर व्हिडिओ व्हायरल
‘कहानी घर घर की’मध्ये रुपाली गांगुलीने साकारली साक्षी तन्वरच्या मुलीची भूमिका, वर्षांनंतर व्हिडिओ व्हायरल
‘कहानी घर घर की’मध्ये रुपाली गांगुली- टीव्हीच्या अनुपमाने वर्षापूर्वी साक्षी तन्वरच्या मुलाची भूमिका साकारली होती, आता खुली पोल ,
View On WordPress
#&039;कहानी घर की&039;मध्ये रुपाली गांगुली#अनुज अनुपमाला सोडून जात आहे#अनुपमा#अनुपमा कलाकार#अनुपमा निर्मात्यांनी समरला संपवले#अनुपमा मध्ये पारस कळनावट#कहाणी घर की#गौरव खन्ना#घरोघरची गोष्ट#झलक दिखला जा 10#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही गॉसिप#टीव्ही बातम्या#नवीनतम टीव्ही गॉसिप्स#पारस कालनावट अनुपमापासून दूर आहे#पारस कालनावट इंस्टाग्राम#पारस काळनावत#मनोरंजन बातम्या#रुपाली गांगुली#समर शहा#साक्षी तन्वर#सुधांशू पांडे#सुवंश धर#स्टार प्लस
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १६ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता ****
भारत पाकिस्तान द���म्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी ��ारतानं विजय मिळवला, आणि बांगलादेशची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे. या विजयाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करून भारत-पाक युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केला. चार मशाली पंतप्रधानांनी प्रज्वलित केल्या असून, त्या देशाच्या कानाकोपर्यात फिरवण्यात येणार आहेत.
१३ दिवस झालेल्या या युद्धाअखेर ९० हजार पाकिस्तानी सैनिक भारताला शरण आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिक शरण येण्याची दुसऱ्या महायुद्धानंतरची ही पहिलीच घटना. या युद्धात भारताचे तीन हजार ९०० जवान धारातीर्थी पडले तर दहा हजार जवान जखमी झाले. भारतीय सैन्यानं रणांगणावर शौर्य तर गाजवलंच पण बांगलादेश मुक्ती वाहिनीला प्रशिक्षणही दिलं.
पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी राष्ट्रीय समर स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन या युद्धातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.
देशाचं सार्वभौमत्व आणि मानवी सन्मानाचं रक्षण करण्यासाठीच्या वचनबद्धतेची पूर्ती करणार्या आपल्या जवानांचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
विजय दिनानिमित्त भारतीय सेनेच्या शौर्य आणि पराक्रमाला नमन करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
भारतीय सेनेनं आपल्या अदम्य साहस आणि पराक्रमानं मानवीय स्वातंत्र्याच्या सार्वभौमिक मुल्यांचं रक्षण करत वैश्विक मानचित्रावर एक ऐतिहासिक बदल घडवला. इतिहासात सुवर्ण अक्षरात अंकित ही शौर्यगाथा प्रत्येक भारतीयासाठी गौरवपूर्ण बाब असल्याचं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
****
देशात अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीच्या खूप संधी असून, २०२४ पर्यंत अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये ३३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित असल्याचा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अॅग्रोव्हिजनतर्फे अन्न प्रक्रियेवर आयोजित एका चर्चासत्रात ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मेगा फूड पार्क योजनेअंतर्गत ३७ फूड पार्क मंजूर केले असून, यापैकी २० पार्कचं काम सुरू झालं आहे. २०��० पर्यंत खाद्य वस्तूची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून, भारत जगातला पाचवा सर्वांत मोठा ग्राहक असणार आहे, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****
0 notes
Text
या अभिनेत्यानेही 'समर शाह'च्या भूमिकेसाठी दिले ऑडिशन, अनुपमापासून सुवंश धरचे पान कापणार?
या अभिनेत्यानेही ‘समर शाह’च्या भूमिकेसाठी दिले ऑडिशन, अनुपमापासून सुवंश धरचे पान कापणार?
सागर पारेख अनुपमा नवीन समर शाह म्हणून: अभिनेता सागर पारेख याने रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना स्टारर ‘अनुपमा’साठी ऑडिशन दिले आहे. या शोमध्ये तो समरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत त्याचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ,
View On WordPress
#अनुपमा#अनुपमा कलाकार#अनुपमा नवीन समर शाह#अनुपमा मध्ये सागर पारेख#अनुपमा समर नवीन फोटो#अनुपमा सागर पारेख#अनुपमाचा नवा समर शहा#गौरव खन्ना#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही बातम्या#तारे अनुपमा सोडतात#पारस कळनावट#पारस काळनावत#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन बातम्या#राजन शाही#राजन शाही शो अनुपमा#रुपाली गांगुली#सागर पारेख#सागर पारेख अनुपमा#सागर पारेख इंस्टाग्राम#सागर पारेख यांचे चरित्र#सागर पारेख यांचे फोटो#सागर पारेख यांनी अनुपमावर मौन तोडले#सागर पारेख वय#सुधांशू पांडे#सुवंश धर#सुवंश धर विरुद्ध सागर पारेख
0 notes
Text
वनराजची बरखा आणि अंकुशला धमकी - किंजल लढणार जीवन-मरणाशी, वनराज बनणार बरखाच्या जीवाचा शत्रू
वनराजची बरखा आणि अंकुशला धमकी – किंजल लढणार जीवन-मरणाशी, वनराज बनणार बरखाच्या जीवाचा शत्रू
अनुपमा मनोरंजन बातम्या: मालिका’अनुपमा‘ आजकाल कथेत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. बरखा सतत अनुपमाच्या आयुष्यात विष ओघळण्याचा प्रयत्न करत असते. मालिका ‘अनुपमा’ आतापर्यंत तुम्ही (अनुपमा लेटेस्ट एपिसोड) मध्ये पाहिले आहे. अनुज आणि अनुपमा त्याच्या कार्यालयात जा. ऑफिस संपल्यानंतर अनुपमा शहा हाऊसला जातात. किंजल, पाखी आणि समर अनुपमासोबत तिच्या घरी जातात. इथे अनुपमाची मुलं आदिक आणि सारासोबत मस्ती…
View On WordPress
#अनघा भोसले#अनुज आणि अनुपमा#अनुज कपाडिया#अनुपमा#अनुपमा 21 जून 2022#अनुपमा अपडेट#अनुपमा आणि अनुज#अनुपमा बातम्या#अनुपमा भाग#अनुपमा लिखित अपडेट#अनुपमा स्पॉयलर#अनुपमा स्पॉयलर अलर्ट#अनुपमा स्पॉयलर अलर्ट भाग क्रमांक ५२५#अनुपमा हॉटस्टार#अनुपमाचा आगामी ट्विस्ट २१ मार्च#काव्या#गौरव खन्ना#टीव्ही#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही गॉसिप#टीव्ही बातम्या#पारस काळनावत#बा आणि अनुपमा#मदालशा शर्मा#मनोरंजन बातम्या#रुपाली गांगुली#वनराज#सुधांशू पांडे#हिंदीत टीव्ही बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 June 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ जून २०१७ दुपारी १.००वा. ****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या नोकरी आणि रोजगारांविषयीच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. यासंदर्भातली संपूर्ण माहिती संकलित झाल्यानंतरच नोकरी आणि रोजगार निर्मितीसंबंधीचं नवं धोरण ठरवता येईल, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी नुकतंच व्यक्त केलं होतं. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंचवीस तारखेला ‘मन की बात’ या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या दिवशी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. नागरिकांनी आपले विचार आणि सूचना नरेंद्र मोदी ॲप��र किंवा माय जीओव्ही ओपन फोरम वर पाठवाव्यात, असं पंतप्रधानांनी ��का ट्वीटद्वारे सांगितलं आहे. **** वस्तू आणि सेवा कर परिषदेची १७ वी बैठक नवी दिल्ली इथे आता सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला सर्व राज्यांचे, तसंच केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री उपस्थित राहत आहेत. येत्या एक जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवा कर कायदा लागू होणार असून, या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. लॉटरीचे दर, ई-वे बिल यासह नफेखोरीला आळा घालण्याचे उपाय यासंदर्भातल्या नियमांना या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. **** काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा या भागात भारतीय सैन्याच्या काफिल्यावर अतिरेकी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला आहे. **** केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वन्यजीवांविषयी माहिती देण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना यासंबंधी ज्ञान मिळवण्यासाठी चालना मिळावी, यासाठी मंडळ राष्ट्रीय पातळीवर वन्यजीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धाही आयोजित करणार आहे. येणाऱ्या पिढीला वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जागृत आणि प्रोत्साहित करावं, यासाठी हा निर्णय घेतल्याचं मंडळानं सांगितलं आहे. **** १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातल्या एक अग्रणी सेनानी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, यांचा आज स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणी लक्ष्मीबाई यांना आदरांजली वाहिली आहे. **** भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हेसुद्धा उपस्थित होते. ठाकरे आणि शहा यांच्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक, शेतकरी संप आणि कर्जमाफी यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. **** गडचिरोली पोलिसांनी काल दुपारी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर एका नक्षलवाद्याला अटक केली. सोमा वेलाडी नावाचा हा नक्षलवादी, महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये गेल्या वीस वर्षात घडलेल्या अनेक हिंसक नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी होता. या नक्षलवाद्याला पकडणाऱ्यांना सोळा लाख रूपयांचं बक्षीस जाहीर झालेलं होतं. **** दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेमधल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, अर्थात ऑरिक सिटीच्या बिडकीन परिसरातल्या कामाला येत्या तीन महिन्यात सुरूवात होणार आहे. यामध्ये सुमारे अडीच हजार एकर परिसरात पायाभूत सुविधा उभारण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ऑरिक सिटीच्या पायाभूत सुविधांसाठी मंजूर केलेल्या सुमारे सहा हजार आठशे अट्ठ्यांऐशी कोटी रूपयांच्या निधीतून, तीन टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण केलं जाणार आहे. **** नांदेड वाघाळा शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पाला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत ही मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी दीड कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, यातून वनक्षेत्र वाढवण्यासाठी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसंच लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी कुंपणं आणि जाळ्या उभारणे यासह इतर सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. **** ऐतिहासिक औरंगाबाद शहराची जडणघडण आणि ऐतिहासिक ठेवा याबाबतची माहिती सर्वांना असावी, या उद्देशानं इतिहासप्रेमींनी सुरु केलेला हेरिटेज वॉक आज सकाळी हिमायत बागेत घेण्यात आला. इतिहास अभ्यासक डॉक्टर दुलारी आणि रफत कुरेशी यांनी इतिहास प्रेमी नागरिकांना या परिसरातील चांदनी चबुतरा, शक्कर बावडी, बारादारी, समर पॅलेस या वास्तू आणि वैशिष्ट्यांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थी, इतिहास संशोधक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. **** औरंगाबाद शहराचं वैयक्तिक शौचालयं बांधण्याचं लक्ष्य पूर्ण व्हावं, या उद्देशानं शासकीय अनुदानात पालिकेच्या निधीतून तीन हजार रुपयांची भर घालण्याची तयारी महापालिकेच्या प्रशासनानं केली आहे. शासकीय अनुदानातून मिळणाऱ्या १२ हजार रुपयांत शौचालयाचं बांधकाम आणि सेफ्टिक टँक बांधणं शक्य नसल्याची बाब अनेक लाभार्थिंनी पालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या योजनेसाठी लाभार्थ्यांना १५ हजार रुपये मिळणार आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्य शासनानं औरंगाबाद शहराला सात हजार वैयक्तिक शौचालयं बांधायचं लक्ष्य ठरवून दिलं आहे.हे लक्ष्य पूर्ण व्हावं, यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांची मदतही घेतली जाणार आहे. //*******//
0 notes